**आषाढी वारीपूर्वी बार्शी तालुका पोलिसांचा धडाका; 53 रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई**

**आषाढी वारीपूर्वी बार्शी तालुका पोलिसांचा धडाका; 53 रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई**

**KDM NEWS बार्शी | प्रतिनिधी आगामी आषाढी वारी तसेच विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बार्शी तालुका पोलिसांनी मोठी प्रतिबंधक कारवाई करत रेकॉर्डवरील 53 गुन्हेगारांविरुद्ध धडक मोहीम राबविली. या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला आहे.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अक्षय सोनवणे यांनी गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेत प्रतिबंधक कारवायांची मालिका सुरू केली आहे.

आषाढी वारी आणि आगामी सण-उत्सव शांततापूर्ण, सुरक्षित व निर्विघ्न वातावरणात पार पडावेत, तसेच रेकॉर्डवरील, ‘टू प्लस’ व सराईत गुन्हेगारांनी कायद्याचे पालन करून पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये, या उद्देशाने ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेअंतर्गत आज एकूण 53 आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.

ही कारवाई प्रभारी अधिकारी श्री. अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. कुलदीप सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक श्री. आबासाहेब शिरगिरे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्री. राजकुमार यावलकर, बीट अंमलदार सदाशिव गवळी, सोमनाथ खांडेकर, अरुण डुकळे, प्रदीप चौधरी, गणेश दळवी तसेच बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधक कारवाया सातत्याने सुरू असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भविष्यातही अशाच कठोर आणि प्रभावी मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**