*"बार्शीत दहशतीचे वातावरण; सौंदरे गावात आई-मुलाला बेदम मारहाण करत फोडला २५ हजारांचा मोबाईल"*

*"बार्शीत दहशतीचे वातावरण; सौंदरे गावात आई-मुलाला बेदम मारहाण करत फोडला २५ हजारांचा मोबाईल"* 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर), ६ जुलै २०२६:** बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१५/२०२६ नोंद झालेल्या एका धक्कादायक घटनेत स्थानिक गावकऱ्यांनी एका महिलेचा मुलगा विनाकारण शिवीगाळ करतो म्हणून त्याला आणि त्याच्या आईला जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात लोखंडी कोयता, लाकडी पट्टी, काठी आणि दगडांचा वापर करण्यात आला. आरोपींनी फियादीचा मोबाईल फोडून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान केल्याचेही सांगण्यात आले आहे.

फियादी सुनिता दौलत मोरे (४६ वर्षे, रा. सौंदरे, ता. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ४ जुलै २०२६ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मौजे सौंदरे गावातील अविनाश लोंढे यांच्या घरासमोर ही घटना घडली. आरोपींनी फियादीला "तुझा मुलगा आम्हाला विनाकारण शिवीगाळ करतो" असे म्हणत हल्ला चढवला. फियादीचा मुलगा किरण दौलत मोरे याला गंभीर मारहाण करण्यात आली. फियादी स्वतः हाताने आणि लाथाबुक्याने मार खाल्ल्याचे सांगितले. हल्ल्यादरम्यान फियादी मोबाईलवर शूटिंग करत असताना आरोपींनी तो हिसकावून फोडला.

**आरोपींची नावे:**- जयवंत जयहिंद मोरे चेतन तकदीर ढावारे- ओम जयवंत मोरे- प्रदिप दिपक मोरे- रोहन दिपक मोरे सर्व आरोपी सौंदरे गावातील रहिवासी आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी "पुन्हा नादी लागलास तर जिवंत सोडणार नाही" अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी भादंवि कलम ११८(२), ११८(१), ३५२, ३५१(२), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ३२४(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी किरण दौलत मोरे व त्यांची आई सुनिता मोरे यांना वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ./१७५ खांडेकर हे तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपींच्या शोधात तपास सुरू केला असून लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही घटना सौंदरे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण करणारी ठरली आहे. स्थानिक पातळीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली आहे. अधिक तपास सुरू आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**बार्शी तालुक्यात हल्ल्यांच्या घटना वाढल्या; बिबट्या व वाघाची दहशत, बार्शीतील चुंबमध्ये शेतकऱ्यांच्या गाईवर हल्ला**