**सोलापूर ग्रामीण : देशी बनावट पिस्तुलांसह ४ जणांना अटक; ३ पिस्तुल, ६ काडतुसे जप्त**
**सोलापूर ग्रामीण : देशी बनावट पिस्तुलांसह ४ जणांना अटक; ३ पिस्तुल, ६ काडतुसे जप्त**
**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर :** स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सांगोला तालुक्यातील हातीद येथे सांगोला-मिरज महामार्गावरील ब्रिजखाली छापा टाकून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या चार संशयितांना अटक केली. या कारवाईत तीन देशी बनावट पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे आणि चार मोबाइल फोन जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ४६ हजार २०० रुपये आहे.
मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या देखरेखीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, उपनिरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या पथकाने हातीद गावाजवळील ब्रिजखाली तीन संशयितांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे :
- अवधूत सुभाष कैगार (२७), रा. कोळा, ता. सांगोला
- हर्शवर्धन उर्फ बालाजी नामदेव ऐवळे (२४), रा. किडेभीसरी, ता. सांगोला
- आबा धोंडीराम नरळे (२९), रा. जुनोनी, ता. सांगोला
अंगझडतीत अवधूत कैगार यांच्याकडून एक देशी पिस्तुल (मॅगझीनसह), दोन जिवंत काडतुसे आणि मोबाइल; तर हर्शवर्धन ऐवळे यांच्याकडून एक देशी पिस्तुल (मॅगझीनसह), दोन जिवंत काडतुसे आणि मोबाइल मिळाला. दोघांनीही परवान्याबाबत समाधानकारक उत्तर दिले नाही. तपासात त्यांनी हे पिस्तुल व काडतुसे दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील महेबुब यांच्याकडून घेतल्याचे सांगितले.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा नं. ६२३/२०२६ नोंद करण्यात आला असून, भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३ व २५ अंतर्गत कारवाई सुरू आहे. न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली.
कोठडीत तपासादरम्यान उपनिरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाने दिलीप शिवाजी अनदर (४६), रा. मदने वस्ती, कोळे, ता. सांगोला यास अटक केली. त्यांच्याकडून आणखी एक देशी पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे आणि एक मोबाइल जप्त करण्यात आला. त्यामुळे एकूण जप्त मुद्देमालात भर पडली.
ही उल्लेखनीय कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, उपनिरीक्षक विजय शिंदे, पोहेकॉ सलीम बागवान, दशरथ गोरे, अतुल धाडगे, रवी माने, विरेश कलशेट्टी, व्यंकटेश मोरे आदींसह सांगोला पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या पथकाने पार पाडली.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या