**तडीपारीचा आदेश झुगारून बार्शीत फिरणारा २४ वर्षीय तरुण पोलिसांच्या जाळ्यात!**
**तडीपारीचा आदेश झुगारून बार्शीत फिरणारा २४ वर्षीय तरुण पोलिसांच्या जाळ्यात!**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. ८ जुलै २०२६ :** बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडीपार आदेशाचे उल्लंघन करून फिरणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
७ जुलै रोजी रात्री सपोनि सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीवरून मौजे जामगाव येथील बाळराजे चौक परिसरात तडीपार इसम फिरत असल्याचे कळले. पोलिस पथकाने लगेच घटनास्थळी धाव घेत संशयित इसमास ताब्यात घेतले.
चौकशीत त्याची ओळख **तथागत मुकेश मस्के** (वय २४, रा. भीमनगर, बार्शी) अशी झाली. त्याच्याकडे बार्शी तालुक्यात राहण्याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. सखोल तपासात त्याच्यावर मा. उपविभागीय दंडाधिकारी, सोलापूर यांनी दिलेल्या सोलापूर व धाराशिव जिल्हा तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४२ नुसार बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बार्शी तालुका पोलिस करत आहेत.
ही कारवाई स्थानिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे शक्य झाली असून, तडीपार आदेशांचे काटेकोर पालन होत असल्याचे दिसून येते.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या