**धाराशिव : तेरणा कॉलेजसमोर स्कॉर्पिओसह २५ लाख ३६ हजारांचा गुटखा जप्त; बार्शी व आळणीच्या ५ जणांवर गुन्हा दाखल**

**धाराशिव : तेरणा कॉलेजसमोर स्कॉर्पिओसह २५ लाख ३६ हजारांचा गुटखा जप्त; बार्शी व आळणीच्या ५ जणांवर गुन्हा दाखल** 

**KDM NEWS प्रतिनिधी धाराशिव**, १३ जुलै २०२६ : धाराशिव पोलिसांनी मध्यरात्री तुळजापूर कडून येणाऱ्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पियो गाडीतून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि चघळण्याची तंबाखू यांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत गाडी चालकासह आंतरराज्यीय स्मगलिंग रॅकेटशी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपनिरीक्षक शशिकांत जाधव यांच्या फिर्यादीनुसार, १२ जुलै २०२६ रोजी गुप्त माहितीवरून पोलिस निरीक्षक कुमार दराडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेशकुमार राऊत आणि इतर पोलिसांनी एम.एच.सी.बी. रेस्ट हाऊस (मलसवाडी फाटा) जवळ सापळा लावला होता. तुळजापूरकडून येणारी स्कॉर्पियो (क्र. MH-25 BF-3696) थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वेगात पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज समोर गाडी अडवली.

गाडीतून एक इसम अंधाराचा फायदा घेत पळून गेला. चालक रोहन कदम (रा. आळणी, धाराशिव) याला ताब्यात घेतल्यावर गाडीची झडती घेतली. त्यात **डायरेक्टर स्पेशल पान मसाला** (१८०० पॅकेट्स, किंमत सुमारे ९.०७ लाख रुपये) आणि **शॉट लक्झरी च्यूइंग टोबॅको** (१५०० कॅट, किंमत सुमारे १.२९ लाख रुपये) असा एकूण २५ लाख ३६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गाडीची किंमत १५ लाख रुपये धरून एकूण जप्ती २५.३६ लाख रुपये इतकी आहे.

रोहन कदम याने चौकशीत सांगितले की, पवन जीवन पौळ (रा. आळणी) यांच्या सांगण्यावरून कर्नाटकातील जाफर जमादार (मो. ७८४३०९७८७६) यांच्याकडून हा माल आणला होता. तो अमोल गुंजाळ (मो. ९६३३५७३८४३) यांच्याकडे धाराशिव टोल नाक्याजवळ सोपवायचा होता. याप्रकरणी गणेश मारुतीराव धुमाळ (वय ३४, रा. सोलापूर), रोहन कदम, जाफर जमादार, अमोल गुंजाळ, पवन जीवन पौळ व इतरांविरुद्ध **भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ कलम १२३, २२३, २७४, २७५ व ३(५)** नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपनिरीक्षक अक्षय डिघोळे यांनी पंचांसमक्ष मुद्देमालाची नोंद केली. एक नमुना विश्लेषणासाठी पाठवण्यात आला असून उर्वरित मुद्देमाल सिलबंद करण्यात आला. पोलिस या आंतरराज्यीय साखळीचा शोध घेत आहेत.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**