**बार्शीत अवैध दारू विक्रीवर पोलिसांची धाड; मुद्देमालासह आरोपी अटकेत**
**बार्शीमध्ये अवैध दारू विक्रीचा मुक्काम; ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त**
**KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी):** बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तुळजापूर रोडवरील केदारनाथ चायनिज सेंटरजवळ अवैध दारू विक्री करणाऱ्या एका इसमाला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ९० मिलीच्या १२ प्लास्टिक बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मुद्देमालाची एकूण किंमत ४८० रुपये आहे.
९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.४५ वाजता बार्शी शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल सचिन भारत देशमुख (पीसी/१९७४) यांच्या नेतृत्वाखाली पीसी/४८४ बनसोडे व पीसी/१८६० शेख यांनी पेट्रोलिंग करत असताना बातमीदाराकडून ही माहिती मिळाली. तुळजापूर रोड, केदारनाथ चायनिज सेंटरजवळ आडोशाला एक इसम दारू विक्री करत असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी दोन विश्वासू नागरिकांना पंच म्हणून सोबत घेतले आणि घटनास्थळी धाड टाकली. तेथे लाल प्लास्टिक पिशवी घेऊन बसलेल्या इकबाल शेख (वय ४६, रा. बार्शी) याला पकडण्यात आले. त्याच्या पिशवीत टँगो पंच कंपनीच्या ९० मिली क्षमतेच्या १२ प्लास्टिक बाटल्या आढळल्या. प्रत्येक बाटलीची किंमत ४० रुपये असल्याने एकूण ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी पंचांसमक्ष एक बाटली सीए सॅम्पलिंगसाठी घेतली, तर उर्वरित मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला. या प्रकरणी महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम कलम ६५ (ई) अंतर्गत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे कोणताही परवाना किंवा पास परमीट नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपास बार्शी शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या