**मो. रफी फॅन्स क्लब तळेगाव दाभाडेकडून बार्शीच्या सुनिल फल्ले यांचा विशेष सन्मान**
**मो. रफी फॅन्स क्लब तळेगाव दाभाडेकडून बार्शीच्या सुनिल फल्ले यांचा विशेष सन्मान**
KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : महान पार्श्वगायक स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार, ३१ जुलै २०२६ रोजी मोहम्मद रफी फॅन्स क्लब, तळेगाव दाभाडे येथे रफींच्या गीतांचा विशेष संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला सुमारे ३० सदस्यांनी सहभाग घेतला. त्यांनी रफींच्या लोकप्रिय गीतांची सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. बार्शीचे सुप्रसिद्ध गायक सुनिल फल्ले यांनीही सुरेल आवाजात रफींची गीते सादर केली. यावेळी फल्ले यांनी आपल्या गायन कारकिर्दीत तब्बल ११ हजार गीते पूर्ण केल्याबद्दल स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात नगराध्यक्ष संतोषजी दाभाडे (वस्ताद), नगरसेविका सौ. हेमलता खळदे, लायन्स क्लब अध्यक्षा सौ. अमृता कुलकर्णी तसेच क्लबचे पदाधिकारी सूर्यकांत काळोखे, बिजेंद्र किल्लावाला, नितीन खळदे, बाळासाहेब लोणकर, सुरेश शेंडे, सुनील महाजन, विनायक हेंद्रे, राधेश्याम भांडरी, तुषार केंद्रे, आरिफ सय्यद, सतीश देशपांडे, यश हंबीर, वैशल शहा, सुभाष वाळूंज, रशीद पठाण, अरुण कुलकर्णी, रमेश डोळे आणि पत्रकार शैलजा फुलकर उपस्थित होते.
महेश चौरे, गिरीश चौरे, दीपाली चौरे व बेबीताई फल्ले यांनी फल्ले यांचे अभिनंदन केले. वृक्ष संवर्धन समिती, ओन्ली समाजसेवा संस्था बार्शी, अकाउंटंट असोसिएशन, वीरशैव लिंगायत तेली समाज, प्रसन्नदाता मंडळ, जाणीव फाउंडेशन, फक्त हौशी कलाकार ग्रुप, बार्शी पत्रकार संघ, डिजिटल मिडिया पत्रकार संघ, श्री भगवंत आरती परिवार, हेल्थ क्लब, राधे कृष्ण सेवा मंडळ व जय शिवराय प्रतिष्ठान या संस्थांनीही फल्ले यांच्या यशाबद्दल अभिनंदन व्यक्त केले.
रफींच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमाला संगीतप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. फल्ले यांच्या सन्मानामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या