**जयकुमार गोरे-संजय राऊत वाद पेटला: बार्शीत युवासेनेकडून संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक**
**जयकुमार गोरे-संजय राऊत वाद पेटला: बार्शीत युवासेनेकडून संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक**
KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, ३ ऑगस्ट : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर बार्शीत युवासेनेने आज संजय राऊत यांच्या समर्थनार्थ कार्यक्रम आयोजित केला.
बार्शी शिवसृष्टी येथे सायंकाळी ६ वाजता संजय राऊत यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला. युवासेना बार्शीच्या वतीने शहर व तालुक्यातील शिवसैनिक, युवासैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात युवासेना जिल्हा प्रमुख पांडुरंग घोलप व समन्वयक हर्षवर्धन पाटील यांनी विचार व्यक्त केले. उपस्थितीत युवासेना राज्य सहसचिव उषा पवार, राज्य विस्तारक हेमंत रामगुडे, जेष्ठ शिवसैनिक नवनाथ चोबे, बाळासाहेब मुढे, बापू जाधव, अजित कांबळे, तालुका प्रमुख स्वराज क्षीरसागर, शैलेश माने, भीमराव गंदुरे, अर्जुन सोनवणे, दिपक कसबे, पंकज भदे, अनिकेत शेरखाने, माऊली डोंगरे, किरण स्वामी, दिपक तिवाडी आदींचा समावेश होता.
यापूर्वी भाजप कार्यकर्ते व गोरे यांच्या समर्थकांनी संजय राऊत यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून युवासेनेने हा दुग्धाभिषेक कार्यक्रम केला.
गोरे-राऊत वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून सोलापूर जिल्ह्यातही दोन्ही बाजूंच्या समर्थकांकडून भूमिका मांडल्या जात आहेत. बार्शीतील या कार्यक्रमाला जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या