**सोलापूर जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणात ९९.९९ टक्के नोंदणी पूर्ण**

**सोलापूर जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणात ९९.९९ टक्के नोंदणी पूर्ण** 

*KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, १४ ऑगस्ट २०२६ : भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision) कार्यक्रम सुरू आहे. याअंतर्गत ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) गृहभेटीद्वारे मतदारांना प्रगणना फॉर्म वाटप करून भरून घेत आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस. कार्तीकेयन यांच्या माहितीनुसार, आज १४ ऑगस्टअखेर जिल्ह्यातील एकूण ३९,४१,०९५ मतदारांपैकी ३९,४०,३८२ मतदारांची नोंदणी पूर्ण झाली आहे. हे प्रमाण ९९.९९ टक्के आहे.

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये गैरहजर, स्थलांतरीत, मयत आणि दुबार (एएसडीडी) मतदारांची संख्या खालीलप्रमाणे आहे :

- करमाळा : गैरहजर ३,६२१, स्थलांतरीत २२,३०१, मयत १४,६५२, दुबार ७,३११  
- माढा : गैरहजर १६,४७३, स्थलांतरीत ५,२३६, मयत १३,७५५  
- बार्शी : गैरहजर ७,००६, स्थलांतरीत १८,२१७, मयत ७,०५०, दुबार १६,८५२  
- मोहोळ : गैरहजर १,५३४, स्थलांतरीत १५,२५१, मयत १५,७३३  
- सोलापूर उत्तर : गैरहजर २८,४०४, स्थलांतरीत १४,८६४, मयत १४,७२६, दुबार ८,८९४  
- सोलापूर मध्य : गैरहजर ५८,१९९, स्थलांतरीत २१,८३४, मयत १७,०५९, दुबार २०,१७८  
- अक्कलकोट : गैरहजर ६,८०५, स्थलांतरीत २८,४११, मयत १७,३४४, दुबार १२,९३०  
- सोलापूर दक्षिण : गैरहजर ५,९३७, स्थलांतरीत २३,०२४, मयत ६,०३०, दुबार १२,४०५  
- पंढरपूर : गैरहजर ७,८२७, स्थलांतरीत २३,२९६, मयत १०,४३५, दुबार २०,७४८  
- सांगोला : गैरहजर ४,४५२, स्थलांतरीत ११,०९८, मयत १३,०९३, दुबार ५,४९४  
- माळशिरस : गैरहजर २,९०८, स्थलांतरीत १४,५२२, मयत १३,९७८, दुबार ६,३१४  

**एकूण** : गैरहजर १,२८,७१५, स्थलांतरीत २,०९,२९१, मयत १,४३,८९३, दुबार १,२९,३२६.

ही एएसडीडी यादी २ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामसभा व वॉर्डसभांमध्ये वाचण्यात आली असून solapur.gov.in या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्ष आणि बूथ लेव्हल एजंट्सनाही ती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मतदारांना आवाहन करण्यात आले आहे की, या यादीत स्वतःचे नाव आहे का ते तपासावे. नाव असल्यास १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत बीएलओंकडे संपर्क साधून प्रगणना फॉर्म तात्काळ भरावा किंवा voters.eci.gov.in पोर्टलवर ऑनलाइन सादर करावा. फॉर्म सादर न केल्यास २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट होणार नाही.

प्रारूप यादीत नाव नसल्यास २७ ऑक्टोबर २०२६ रोजी येणाऱ्या अंतिम मतदार यादीत समावेश करण्यासाठी संबंधित बीएलओ, मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे आवश्यक पुरावे सादर करावेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**