*बार्शी : सारोळे ग्रामपंचायत प्रकरणी उपोषणाची तक्रार; विस्तार अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश*

*बार्शी : सारोळे ग्रामपंचायत प्रकरणी उपोषणाची तक्रार; विस्तार अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश* 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी*सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सारोळे येथील श्रीमती प्रभावती रमेश साबळे यांनी दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी उपोषणाला बसण्याबाबत पंचायत समिती बाशीच्या ग्रामपंचायत विभागाला अर्ज दिला आहे. या अर्जाच्या अनुषंगाने पंचायत समिती बाशीने तातडीने कारवाई केली आहे.

पंचायत समिती बाशीच्या ग्रामपंचायत विभागाने (जा.क्र. पंसबा/ग्राप-२/४०५८/२०२६, दि. ३१/०८/२०२६) विस्तार अधिकारी श्री. पी. एस. कुलकर्णी यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांनी दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित ग्रामपंचायतीला भेट देऊन तक्रार अर्जातील मुद्द्यांची मुद्देनिहाय चौकशी करून अहवाल तात्काळ सादर करावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

सहायक प्रशासन अधिकारी, पंचायत समिती बाशी यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या या आदेशात तक्रार अर्जाची प्रतही जोडण्यात आली आहे. प्रत तक्रारदार श्रीमती प्रभावती रमेश साबळे (रा. सारोळे, ता. बार्शी, जि. सोलापूर) तसेच सारोळे ग्रामपंचायतीचे सरपंच/प्रशासक/ग्रामसेवक यांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे.

या प्रकरणात तक्रारदार महिलेने उपोषणाचा निर्णय घेतल्याचे अर्जात नमूद केले असून, प्रशासनाने चौकशीला प्राधान्य दिले आहे. विस्तार अधिकाऱ्यांकडून अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई होणे अपेक्षित आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**