**शिंदेंची_दिल्ली_वारी : खासदारांसह थेट मोदींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण**
**शिंदेंची_दिल्ली_वारी : खासदारांसह थेट मोदींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण**
KDM_NEWS प्रतिनिधी नवी दिल्ली, ७ ऑगस्ट : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीला शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच श्रीरंग बारणे, रवींद्र वायकर, नरेश म्हस्के, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांसह पक्षीय खासदार उपस्थित होते.
भेटीत उद्धव ठाकरे गटातून नुकतेच शिंदे गटात आलेल्या सहा खासदारांसोबत विशेष संवाद झाला. पंतप्रधान मोदींनी ब्रेकफास्ट बैठकीत या खासदारांना थेट आश्वासन दिले, “काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे.” त्यांनी सांगितले की, एनडीए एक परिवार आहे. प्रत्येक खासदाराला सन्मान दिला जाईल आणि संधी मिळेल. मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी थेट पंतप्रधान कार्यालयाशी (PMO) संपर्क साधा, असा स्पष्ट निर्देशही देण्यात आला.
मोदींनी प्रत्येक खासदाराशी वैयक्तिक विचारपूस केली. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या योगाभ्यासाबाबत विशेष चौकशी करत आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. गरीब, शेतकरी आणि मजुरांमध्ये जाऊन समस्या जाणून घ्या तसेच संसदेतील चर्चांमध्ये सक्रिय सहभाग घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.
ही भेट सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हाबाबत सुरू असलेल्या निर्णायक सुनावणीच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. शिंदे व खासदारांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भेटीत राज्यातील विकासकामे, केंद्र-राज्य समन्वय आणि पक्षीय बाबींवर चर्चा झाल्याचे समजते.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या