**सोलापूर जिल्ह्यात मतदार यादी विशेष पुनरिक्षण ९९.९९ टक्के पूर्ण; ३९ लाख ४० हजार ३८२ मतदारांची नोंदणी**
**सोलापूर जिल्ह्यात मतदार यादी विशेष पुनरिक्षण ९९.९९ टक्के पूर्ण; ३९ लाख ४० हजार ३८२ मतदारांची नोंदणी**
*KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, १३ ऑगस्ट : भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील मतदार नोंदणीचे काम ९९.९९ टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात एकूण ३९ लाख ४१ हजार ९५ मतदारांपैकी ३९ लाख ४० हजार ३८२ मतदारांची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. ही माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) मार्फत घरोघरी मतदार पडताळणी झाली. २ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभा व वॉर्डसभेत गैरहजर, स्थलांतरित, मृत व दुबार (एएसडीडी) मतदारांची यादी वाचून दाखवण्यात आली. ही यादी solapur.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असून बीएलओ व राजकीय पक्षांच्या बूथ लेव्हल एजंटांकडेही आहे.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी मतदारांना आवाहन केले की, एएसडीडी यादीत स्वतःचे नाव आहे का ते तपासावे. नाव चुकीने समाविष्ट झाले असेल किंवा नसेल तर १७ ऑगस्टपर्यंत संबंधित बीएलओकडे फॉर्म ईएफ सादर करावा किंवा voters.eci.gov.in पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा.
२४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांनी अंतिम यादीत समावेशासाठी बीएलओ, मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे आवश्यक पुराव्यांसह तात्काळ संपर्क साधावा.
**जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील एएसडीडी आकडेवारी**
- २४४ करमाळा : गैरहजर ३,६२१, स्थलांतरित २२,३०१, मृत १४,६५२, दुबार ७,३११
- २४५ माढा : गैरहजर २,०२२, स्थलांतरित १६,४७३, मृत ५,२३६, दुबार १३,७५५
- २४६ बार्शी : गैरहजर ७,००६, स्थलांतरित १८,२१७, मृत ७,०५०, दुबार १६,८५२
- २४७ मोहोळ : गैरहजर १,५३४, स्थलांतरित १५,२५१, मृत १५,७३३, दुबार ४,४४५
- २४८ सोलापूर उत्तर : गैरहजर २८,४०४, स्थलांतरित १४,८६४, मृत १४,७२६, दुबार ८,८९४
- २४९ सोलापूर मध्य : गैरहजर ५८,१९९, स्थलांतरित २१,८३४, मृत १७,०५९, दुबार २०,१७८
- २५० अक्कलकोट : गैरहजर ६,८०५, स्थलांतरित २८,४११, मृत १७,३४४, दुबार १२,९३०
- २५१ सोलापूर दक्षिण : गैरहजर ५,९३७, स्थलांतरित २३,०२४, मृत १४,७६७, दुबार १२,४०५
- २५२ पंढरपूर : गैरहजर ७,८२७, स्थलांतरित २३,२९६, मृत १०,४३५, दुबार २०,७४८
- २५३ सांगोला : गैरहजर ४,४५२, स्थलांतरित ११,०९८, मृत १३,०९३, दुबार ५,४९४
- २५४ माळशिरस : गैरहजर २,९०८, स्थलांतरित १४,५२२, मृत १३,९७८, दुबार ६,३१४
**एकूण** : गैरहजर १,२८,७१५, स्थलांतरित २,०९,२९१, मृत १,४३,८९३, दुबार १,२९,३२६.
मतदार याद्यांचे हे विशेष पुनरिक्षण पारदर्शक व त्रुटीरहित यादी तयार करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे, असे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या