**बार्शी_उपसा_सिंचन योजना: कोरफळे शिवारातील पंप हाऊसपर्यंत पोहोचले #उजनीचे पाणी; २५०० एकर शेतजमीन ओलिताखाली!**
**बार्शी_उपसा_सिंचन योजना: कोरफळे शिवारातील पंप हाऊसपर्यंत पोहोचले #उजनीचे पाणी; २५०० एकर शेतजमीन ओलिताखाली!**
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :** बार्शी उपसा सिंचन योजना टप्पा-१ अंतर्गत उजनी धरणाचे पाणी आज कोरफळे शिवारातील पंप हाऊसपर्यंत यशस्वीरित्या पोहोचले. यामुळे गावातील सुमारे २५०० एकर शेतजमीन ओलीताखाली येणार आहे.
कोरफळे पंप हाऊस परिसरात ग्रामस्थांच्या वतीने भव्य पाणीपूजन सोहळा आयोजित करण्यात आला. आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या हस्ते पाणीपूजन झाले. या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली मान्यता आणि निधी, तसेच आमदार राऊत यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा व जलसंपदा विभागाशी केलेला समन्वय यामुळे टप्पा पूर्णत्वास आला आहे.
पाणीपूजनानंतर आमदार राऊत म्हणाले, “आज कोरफळे आणि बार्शी तालुक्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे. उजनीचे पाणी पंप हाऊसपर्यंत आले आहे. यामुळे २५०० एकर शेतीला संजीवनी मिळाली. हा श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दूरदृष्टीला जातो. बार्शी तालुक्याला ‘पाणीदार बार्शी’ करण्याचा आमचा संकल्प आहे. पुढील टप्प्यातही अशीच कामे मार्गी लावू.”
गावातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, पिढ्यान्पिढ्या तहान भागली आहे. ५० वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होतो. आता खरीप व रब्बी दोन्ही हंगामात शेती करता येईल. पाण्यासाठी स्थलांतर करावे लागणार नाही. आम्ही या पाण्याचा काटकसरीने वापर करून ठिबक-तुषार सिंचनाचा अवलंब करू.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजय गरड, तालुकाध्यक्ष डॉ. देवेंद्र डोके, माजी उपाध्यक्ष कौरव माने, जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार काळे, तालुकाध्यक्ष बबन गडदे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या
संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कोरफळे ग्रामस्थांनी आमदार राऊत यांचा ‘पाणीदार आमदार’ म्हणून सत्कार केला.
#Barshi #UjaniDam #BarshiUpsaSinchanYojana #Korphale #MaharashtraAgriculture #WaterResource #FarmerNews
#kdmnews
टिप्पण्या