**दाराचं कुलूप तोडलं अन् कपाटात हात घातला... शेंद्री गावात मध्यरात्रीच्या घरफोडीने प्रचंड खळबळ!**

**दाराचं कुलूप तोडलं अन् कपाटात हात घातला... शेंद्री गावात मध्यरात्रीच्या घरफोडीने प्रचंड खळबळ!** 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी**१९ ऑगस्ट  बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे एक लाख एकेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा क्रमांक २६२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शहाजी अरुण चव्हाण (वय ३४, व्यवसाय मजुरी, रा. शेंद्री ता. बार्शी जि. सोलापूर) यांच्या घरी दिनांक १३ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० ते १४ ऑगस्ट रोजी रात्री २.०० या दरम्यान ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लॉक असलेल्या कपाटाचे लॉक तोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.

चोरीला गेलेल्या मालात पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी (४५ हजार रुपये), सव्वादोन ग्रॅमची सोन्याची अंगठी (१२ हजार रुपये), साडेपाच ग्रॅमचे गळ्यातील सोन्याचे गंठण (४७ हजार ५०० रुपये), दिड ग्रॅमची कानातील सोन्याची फुले (७ हजार ५०० रुपये), दोन सोन्याच्या नथी (७ हजार ५०० रुपये), अर्धा ग्रॅमची सोन्याची रिंग (५ हजार रुपये), सव्वा तीन ग्रॅमची गळ्यातील सोन्याची ठुशी (१५ हजार रुपये) आणि एक भार चांदीचा करंडा (२ हजार रुपये) यांचा समावेश आहे. एकूण अंदाजे किंमत एक लाख एकेचाळीस हजार पाचशे रुपये इतकी आहे.

फिर्यादीने अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोहेकॉ/१७५ खांडेकर यांनी गुन्हा दाखल केला असून, पो.स.ई. शिरगिरे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे. 

KDM NEWS प्रतिनिधी 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**