*बार्शी हादरली! कॉलेजला जाते म्हणून निघालेली १७ वर्षीय विद्यार्थिनी गूढ रीतीने बेपत्ता; आईची पोलिसांत तक्रार*
*बार्शी हादरली! कॉलेजला जाते म्हणून निघालेली १७ वर्षीय विद्यार्थिनी गूढ रीतीने बेपत्ता; आईची पोलिसांत तक्रार*
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :** शहरातील अलीपूर रोड परिसरातील १७ वर्षीय बारावी सायन्स शाखेतील विद्यार्थिनी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. कॉलेजला जाते असे सांगून सकाळी सायकलवरून घराबाहेर पडलेली मुलगी रात्रीपर्यंत परतली नाही. कुटुंबीयांनी शोध घेतला, पण तिचा ठावठिकाणा लागला नाही. तिच्या आईने बार्शी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ही अल्पवयीन विद्यार्थिनी महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालयात बारावी सायन्स शाखेत शिकते. २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे कॉलेजला जाते, असे सांगून ती सायकलवरून घरातून निघाली. सायंकाळी सात वाजेपर्यंत ती घरी परतत असे. मात्र त्या दिवशी ती न आल्याने आईने सायंकाळी ७.१५ वाजता तिच्या मोबाईलवर फोन केला. अनोळखी व्यक्तीने फोन उचलला आणि लगेच कट केला. नंतर मोबाईल बंद आढळला.
वडिलांनी कॉलेज व स्टडी क्लासमध्ये चौकशी केली. वर्गातील विद्यार्थिनींनी सांगितले की, ती त्या दिवशी कॉलेजमध्ये आलीच नव्हती. मैत्रिणी, नातेवाईक आणि परिसरात शोध घेतला, तरी तिचा पत्ता लागला नाही.
कुटुंबीयांच्या मते, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय आहे. आईने अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. विद्यार्थिनीबाबत माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या