**बार्शी : हर्निया ऑपरेशनमधील कथित निष्काळजीपणामुळे ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू; कुटुंबीयांनी पोलीस तक्रार**
*बार्शी : हर्निया ऑपरेशनमधील कथित निष्काळजीपणामुळे ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू; कुटुंबीयांनी पोलीस तक्रार*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २९ ऑगस्ट : बार्शी येथील यादव हॉस्पिटलमध्ये हर्निया ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांकडून कथित निष्काळजीपणा व चुकीच्या उपचारांमुळे डोमगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) येथील ६० वर्षीय हंबीरराव नामदेव साबळे यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मृतांच्या कन्या सारिका गुरुदास पाटील (रा. देवगांव बु., ता. परांडा) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्याला अर्ज देऊन डॉ. बी. एस. यादव यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधासारख्या गुन्ह्याची नोंद करण्याची मागणी केली आहे.
अर्जात म्हटले आहे की, १० ऑगस्ट २०२६ रोजी सोमवारी यादव हॉस्पिटलमध्ये डॉ. बी. एस. यादव यांनी हंबीरराव साबळे यांचे हर्निया ऑपरेशन केले. ऑपरेशनानंतर रुग्णाची प्रकृती अचानक गंभीर झाली. त्यानंतर डॉक्टरांनी सीटी स्कॅनसाठी जगताळेमामा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. १३ ऑगस्ट रोजी डॉ. यादव, डॉ. पोकळे व डॉ. मोराळे यांनी मिळून “आतड्याला छिद्र पडले” असे सांगत पोटाचे दुसरे ऑपरेशन केले. त्यानंतरही प्रकृती आणखी खालावल्याने १७ ऑगस्ट रोजी रुग्णाला आश्विनी हॉस्पिटल, सोलापूर येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान १९ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.
सारिका पाटील यांनी अर्जात म्हटले आहे की, पहिल्या ऑपरेशनमधील निष्काळजीपणा व चुकीच्या पद्धतीमुळेच वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉ. बी. एस. यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. तक्रारदाराचा मोबाइल क्रमांक ८०८००१६५९९ असा आहे.
बार्शी शहर पोलीस ठाण्याकडे ही तक्रार दाखल झाली असून पुढील चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या