"कार्यक्रम रद्द करा, नाहीतर..."; मनोज जरांगे पाटील यांचा खासदार बंडू जाधव यांना थेट इशारा

"कार्यक्रम रद्द करा, नाहीतर..."; मनोज जरांगे पाटील यांचा खासदार बंडू जाधव यांना थेट इशारा 

#KDM NEWS प्रतिनिधी #अंतरवाली_सराटी (जालना) येथे मराठा #आरक्षणासाठी आमरण उपोषणावर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना फोनवरून थेट इशारा दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज परभणीत होणाऱ्या शेतकरी-युवा संवाद मेळाव्याबाबत जरांगे म्हणाले, “कार्यक्रम तात्काळ रद्द करा. नाहीतर मी तिथे येईन.”

बंडू जाधव यांनी मात्र ठामपणे सांगितले की परभणीतील कार्यक्रम होणारच. यावर जरांगे पाटील संतापले. ते म्हणाले, “तू एक लक्षात ठेव. शेतकऱ्यांच्या आडून मराठ्यांच्या अंगावर शिरसाटांचे ऐकून शेतकऱ्याच्या कार्यक्रमाच्या नावाखाली शिंदेंना नाचवलंस. आता याची परतफेड होणार आहे. १२ सप्टेंबरला आमची तारीख जाहीर होईल. परतफेड मुंबईत होणार. बंडूला उतरता कळी लागली.”

जरांगे यांनी पुढे म्हटले की परभणीच्या सर्व बॉर्डर्स सील केल्या आहेत. त्यामुळे परभणीत ताकद वाया घालवण्यापेक्षा मुंबईत जाऊन आंदोलन करणार आहोत. “बंडू जाधव हा थर्ड क्लास माणूस निघाला. ५०० गुंड असतील तरी त्यावर राजकारण चालत नाही. आता तुझ्यामुळे आणि शिरसाटमुळे एकनाथ शिंदे आणखी खोलात गेला आहे. कार्यक्रम रद्द न करणे ही तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. मराठा समाज संभाळणे हे तुझे अस्तित्व होते, कार्यक्रम घेणे नव्हते.”

यापूर्वी जरांगे पाटील यांनी फोनवर बंडू जाधव यांना सांगितले होते की मराठ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात येत असताना शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेऊ नका. अन्यथा गोंधळ अटळ आहे आणि राज्य पुन्हा अस्थिर होईल. मी आलो तर तुमची पंचाईत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना (उबाठा) सोडून शिंदे गटात गेलेले खासदार बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा क्रीडा संकुलात शेतकरी व युवा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिंदे उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याची मोठी तयारी करण्यात आली असून जिल्ह्यात भगवे झेंडे आणि होर्डिंग्स दिसत आहेत. जरांगे यांच्या इशार्यानंतरही कार्यक्रम रद्द न केल्याने आता पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. सरकारच्या शिष्टमंडळाशी अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरू राहील, असा त्यांचा निर्धार आहे.

KDM NEWS प्रतिनिधी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**