*कोविड काळातील मराठा आक्रोश मोर्चा: आमदार विजयकुमार देशमुख, राजेंद्र राऊतांसह ३० जण न्यायालयात उपस्थित*

*मराठा आक्रोश मोर्चा: कोविड नियमभंग प्रकरणी चार विद्यमान आमदारांसह ३० आरोपी न्यायालयात हजर* 

*KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर :** मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ४ जुलै २०२१ रोजी काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रोश मोर्चाप्रकरणी चार विद्यमान आमदारांसह एकूण ३० आरोपी आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. शिंदे यांच्या न्यायालयात हजर झाले. या खटल्यात एकूण ४८ आरोपी असून, त्यापैकी ३० जणांनी हजेरी लावली.

आरोपींमध्ये विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान अवताडे व राजेंद्र राऊत यांचा समावेश आहे. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि माजी खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांच्यासह इतर नेते व कार्यकर्तेही आरोपी आहेत.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेने मोर्चाला परवानगी नाकारली होती. तरीही समन्वयक राम जाधव व किरण पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आल्याचा आरोप आहे. फौजदार चावडी पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ देशमाने यांनी फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र सादर केले आहे.

समन्स प्राप्त झाल्यानंतर आज आमदारांसह इतर आरोपी न्यायालयात हजर झाले. आरोपींच्या वतीने ॲड. संतोष न्हावकर, ॲड. सचिन साखरे, ॲड. राहुल रूपनर, ॲड. बाबासाहेब जाधव, ॲड. राज म्हात्रे व ॲड. अजिंक्य जाधव यांनी बाजू मांडली. सरकारतर्फे ॲड. संतोष पाटील उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**