*एसटी सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती; अर्ज नोंदणीची अंतिम मुदत १४ सप्टेंबर*
**एसटी सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती; अर्ज नोंदणीची अंतिम मुदत १४ सप्टेंबर**
*KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, ३१ ऑगस्ट (जि.मा.का.) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) सोलापूर विभागात शिकाऊ उमेदवार भरती २०२६-२७ अंतर्गत एक वर्षाच्या कालावधीसाठी एकूण ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ‘MSRTC Solapur Division’ या आस्थापनेसाठी रजिस्ट्रेशन क्रमांक E09162700889 वर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीची अंतिम मुदत १४ सप्टेंबर २०२६ आहे.
भरतीबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी विभागीय कार्यालय, १९० बुधवार पेठ, सोलापूर-४१३००२ येथे संपर्क साधावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अमोल चंदकांत गोंजारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
ही भरती शिकाऊ उमेदवार योजनेअंतर्गत असून प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा राहील. पात्र उमेदवारांनी वेळेत ऑनलाइन नोंदणी पूर्ण करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या