**जळगाव : ग्रामसभेत शिवीगाळ-पाठलागानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; सहा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा**

**जळगाव : ग्रामसभेत शिवीगाळ-पाठलागानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; सहा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा** 

KDM NEWS प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे गावात १६ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेदरम्यान एक दुःखद घटना घडली. ग्रामसेवक पी. एन. पाटील यांना काही ग्रामस्थांकडून शिवीगाळ, हुल्लडबाजी आणि मारहाणीचा प्रयत्न झाल्यानंतर तीव्र मानसिक तणाव आला. त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ग्रामसभेत विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असताना काही तरुण आक्रमक झाले. त्यांनी सरपंच आणि ग्रामसेवक पाटील यांना टार्गेट करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पाटील अस्वस्थ झाले. त्यांनी सभा अर्धवट सोडून स्वतःच्या दुचाकीने पारोळा सिव्हिल रुग्णालयाकडे प्रस्थान केले. मात्र काही तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. या पाठलागाने त्यांचा तणाव आणखी वाढला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांना जोरदार हृदयविकाराचा झटका आला आणि प्राण गमावला.

मृत्यूची बातमी पसरताच परिसरातील ग्रामसेवक संघटनांच्या अधिकाऱ्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. मोबाईल व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली. करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही पाठिंबा दर्शवत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

दबाव लक्षात घेता पोलिसांनी रात्री उशिरा हुल्लडबाजी आणि पाठलाग करणाऱ्या सहा संशयितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. तपास सुरू असून उर्वरित संशयितांचा शोध घेतला जात आहे. घटनेमुळे पारोळा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**