*बार्शी : सामाईक विहिरीच्या पाण्यावरून चुलतभावाने लोखंडी गजाने डोक्यात मारले; शेतकरी आयसीयूमध्ये*

*बार्शी : सामाईक विहिरीच्या पाण्यावरून चुलतभावाने लोखंडी गजाने डोक्यात मारले; शेतकरी आयसीयूमध्ये* 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी*बार्शी तालुक्यातील उंबरगे गावात सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून चुलतभावाने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी सध्या जगदाळे मामा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचाराधीन आहे.

दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी सुमारे ५ वाजता मौजे उंबरगे येथील शेती गट क्रमांक १०५ येथे घटना घडली. फिर्यादी अमर माणिक जाधव (वय ३५, शेतकरी, रा. उंबरगे) आणि त्यांची आई चंद्रकला यांनी सामाईक विहिरीतून इलेक्ट्रिक मोटरने सोयाबीन पिकाला पाणी देत असताना फिर्यादीचे चुलतभाऊ नितीन जनक जाधव आणि चुलते जनक पांडुरंग जाधव तेथे आले. नितीनच्या हातात लोखंडी गज होता. त्याने “तू मोटर का चालू केली?” अशी शिवीगाळ करत फिर्यादीच्या डाव्या बाजूच्या डोक्यात आणि उजव्या हातावर लोखंडी गजाने मारहाण केली. त्याचवेळी जनक पांडुरंग जाधव यांनी दगडाने फिर्यादीच्या पाठीत मारले. भांडण सोडविण्यासाठी आई हस्तक्षेप करत असताना रामदास जनक जाधव आला आणि त्याने फिर्यादी व आईला जिवे मारण्याची धमकी दिली.

फिर्यादीला जखमी अवस्थेत जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी येथे दाखल करण्यात आले असून ते आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत. हल्ल्यात वापरलेली हत्यारे लोखंडी गज आणि दगड असल्याचे नमूद आहे. वादाचे मुख्य कारण सामाईक विहिरीच्या पाण्याचा वापर असल्याचे फिर्यादीने सांगितले.

एमएलसी जबाबानंतर बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे गु.र. नं. २७८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील असून तपास पोहेको डुकळे यांच्याकडे आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**