**सोलापूर ग्रामीण : वैराग-सोलापूर रोडवर मोटरसायकल अपघात; ४५ वर्षीय शेखनुर शेख यांचा मृत्यू, अज्ञात चालकावर गुन्हा**

**सोलापूर ग्रामीण : वैराग-सोलापूर रोडवर मोटरसायकल अपघात; ४५ वर्षीय शेखनुर शेख यांचा मृत्यू, अज्ञात चालकावर गुन्हा** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी **सोलापूर जिल्ह्यातील वैराग पोलीस ठाणे हद्दीत २९ जुलै २०२६ रोजी रात्री साडेसात ते सात चाळीस वाजता शेळगाव (आर) ता. बार्शी गावाच्या पुढे वैराग-सोलापूर रोडवर एका भीषण मोटरसायकल अपघातात ४५ वर्षीय शेखनुर दगडू शेख (रा. गणेश नगर बाळे, ता. उत्तर सोलापूर) यांचा मृत्यू झाला. अपघातात त्यांच्या मोटरसायकलला सुमारे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. मृताच्या मुलाने १० ऑगस्ट रोजी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलीसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी साहिल शेखनुर शेख (वय १९, शिक्षण  यांनी दिलेल्या जबाबात सांगितले की, त्यांचे वडील २९ जुलै रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या मोटरसायकल (एमएच १३ डीएफ १३५४) वरून बाळे येथून धामणगाव ता. बार्शी येथील आत्याकडे गेले होते. रात्री आठ वाजता आत्याचा मुलगा शौकत महुलाला शेख यांनी फोन करून सांगितले की, धामणगावहून सोलापूरकडे येताना रात्री साडेसात वाजता शेळगाव (आर) गावाच्या पुढे एका मोटरसायकल चालकाने ओव्हरटेक करत पाठीमागून जोरदार धडक दिली. शेखनुर शेख खाली पडले, बेशुद्ध झाले आणि कानातून रक्त येत होते. तेथे जमा झालेल्या लोकांनी १०८ अॅम्ब्युलन्स बोलावली आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारांसाठी पाठवले.

सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना ३१ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता शेखनुर शेख यांचा मृत्यू झाला. धडक देणाऱ्या मोटरसायकलचा नंबर एमएच १३ ईयू ५००५ असल्याचे फिर्यादीने पाहिले होते. परंतु चालकाचे नाव-पत्ता माहित नव्हते. वडिलांच्या विधी आणि दहाव्या दिवसाच्या विधीमुळे साहिल शेख आज रोजीच पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी हजर झाले.

फिर्यादीनुसार, अज्ञात चालकाने हायस्पीडने, अविचाराने आणि रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता मोटरसायकल चालवत पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात घडला. त्यामुळे शेखनुर शेख गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मयत झाले. वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद क्रमांक ०३१८ नोंदवण्यात आली असून महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ चे कलम १८४ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ आणि ३२४(४) अन्वये अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**