**बार्शी_पोलिसांचा_मोठा दणका! ३१ लाखांच्या रेशनच्या धान्यासासह ४ आरोपी जेरबंद**

**बार्शी_पोलिसांचा_मोठा दणका! ३१ लाखांच्या रेशनच्या धान्यासासह ४ आरोपी जेबंद** 

KDM_NEWS_प्रतिनिधी बार्शी, ७ ऑगस्ट : गोरगरीबांसाठी शासनाकडून मोफत पुरवण्यात येणाऱ्या रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर बार्शी तालुका पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. एकाच कारवाईत तब्बल १९,३०० किलो तांदूळ, गहू आणि उडीद डाळ जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची किंमत ३१ लाख १५ हजार ९८१ रुपये आहे.

तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि तहसीलदार बार्शी यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार मौजे फपाळवाडी येथील रेल्वे स्टेशनसमोरील अरणगाव रस्त्यावरील मांगडे यांच्या शेतात असलेल्या पत्रा शेडमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य साठवून ट्रक आणि पिकअपमध्ये भरून विक्रीसाठी नेले जात आहे.

महसूल प्रशासन, पुरवठा प्रशासन आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. तेथे पोत्यांमध्ये भरलेला तांदूळ, गहू आणि उडीद डाळ वाहनांमध्ये भरत असताना आढळला. पंचनामा करून वाहनांसह सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुंटलवाड यांच्या फिर्यादीवरून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता या कायद्यांखाली चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:

1. धनाजी अर्जुन मांगडे  
2. गजेंद्र अर्जुन मांगडे  
3. चांगदेव पिराजी दळवी  
4. गणेश श्रीहरी कदम  

सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून आज त्यांना न्यायालयात पोलीस कस्टडीसाठी हजर करण्यात येणार आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करीत आहेत. या प्रकरणात आणखी आरोपींचा समावेश असण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप आणि तहसीलदार बार्शी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, युवराज गायकवाड, सिद्धेश्वर लोंढे, गोविंद बचूटे आणि पुरवठा निरीक्षक यांचा सहभाग होता.

गोरगरीबांच्या हक्काचे धान्य हिरावून घेणाऱ्यांवर पुढील कारवाईही सुरू राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

KDM NEWS प्रतिनिधी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**