**बार्शीत डीजेवर असभ्य डान्स, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग; सहा जणांवर गुन्हा दाखल**
**बार्शीत डीजेवर असभ्य डान्स, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग; सहा जणांवर गुन्हा दाखल**
KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, ९ ऑगस्ट : बार्शी शहरातील पांडे चौक येथे अवैध ध्वनीप्रक्षेपण करून पाचपेक्षा जास्त व्यक्ती जमवून डीजेवर असभ्य हावभाव करून डान्स केल्याप्रकरणी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा क्रमांक ६०३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, ३(५) तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादी पोलीस हवालदार विश्वजीत शिवाजी ठोगे (वय ४०, बार्शी शहर पोलीस ठाणे) यांनी तक्रार दिली.
आरोपींमध्ये अनिकेत सदाशिव गायकवाड (रा. माळवाडी कोथोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर – खपाणे मालक), आनंद गुलाब डोलारे (रा. लहूजी चौक, बार्शी – मध्यवर्ती जयती उत्सव अध्यक्ष), अदित्य विशाल चौगुले (नगर रोड, सोलापूर – डिजे डाबी मालक, व्हेमपायर), साईराम उत्तम शिंदे (रा. टिळक चौक, बार्शी – अध्यक्ष), अर्थव सुनिल नागुन (रा. आर्थी, ता. हवेली, जि. पुणे – डिजेबी मालक, आरके पॉवर) आणि विजयभाउ रणदिवे (रा. टिळक चौक, बार्शी – स्वर शंभु प्रतिष्ठा अध्यक्ष) यांचा समावेश आहे.
घटना ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता पांडे चौक येथे घडली. आरोपींनी ध्वनीप्रक्षेपण सुरू केले. पाचपेक्षा जास्त व्यक्ती जमून डीजेवर असभ्य हावभाव करून डान्स करीत असल्याचे निदर्शनास आले. सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा भंगही झाला.
९ ऑगस्ट रोजी सकाळी १.४४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा वर्दी अहवाल न्यायालयात पाठविण्याची तजवीज ठेवण्यात आली असून तपास पोलीस निरीक्षक गणेश कुभार सी यांच्या आदेशाने पदवीधर तपासी अंमलदार पोकॉ ६७ तांबोळी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या