**बार्शी पोलिसांची धडक कारवाई! दोन सराईत वाहनचोरांना बेड्या, १० दुचाकींसह ८ लाख २० हजार लाखांचा मुद्देमाल हस्तगत**

**बार्शी पोलिसांची धडक कारवाई! दोन सराईत वाहनचोरांना बेड्या, १० दुचाकींसह ८ लाख २० हजार लाखांचा मुद्देमाल हस्तगत** 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १३ ऑगस्ट : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे दोन सराईत वाहनचोरांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून पुणे, येडशी, लातूर व परिसरातून चोरी केलेल्या एकूण १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. यात चार बुलेट मोटारसायकलींचा समावेश असून मुद्देमालाची अंदाजे किंमत ८ लाख २० हजार रुपये आहे.

राऊत चाळ, स्टेशन रोड, बार्शी येथील प्रतीक चंद्रकांत पवार (३०) यांच्या मालकीची काळ्या रंगाची बुलेट ३५० ईएफआय (क्रमांक एमएच२५एवाय२४७६) ही ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री घरातून चोरीला गेली होती. याची किंमत सुमारे १ लाख २५ हजार रुपये होती. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६०१/२०२६, बीएनएस कलम ३०३(२) अन्वये दाखल झाला होता.

गुन्हे प्रकटीकरण पथकाने समांतर तपास सुरू ठेवला. तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या मदतीने संशयित आरोपींची माहिती मिळाली. चौकशीत आरोपींनी बार्शीसह पुणे, येडशी, लातूर व इतर परिसरातून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेले आरोपी आकाश हरीचंद राठोड (२२, रा. कन्हेरगाव, ता. परळी, जि. बीड) आणि ऋषिकेश महादेव सुरवसे (२३, रा. मांजरी, ता. व जि. लातूर) हे आहेत. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या १० दुचाकींची एकूण किंमत सुमारे ८ लाख २० हजार रुपये आहे.

या कारवाईमुळे वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात बार्शी शहर पोलिसांना यश मिळाले आहे.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**