*बार्शी: 'तू माझ्याविरोधात खोट्या केसेस करतोस' म्हणत शेतकऱ्याच्या पाठीवर चाकूने वार; आरोपीवर गुन्हा दाखल*
*बार्शी: 'तू माझ्याविरोधात खोट्या केसेस करतोस' म्हणत शेतकऱ्याच्या पाठीवर चाकूने वार; आरोपीवर गुन्हा दाखल*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २५ ऑगस्ट २०२६ : बार्शी तालुक्यातील फपाळवाडी येथे १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता एका शेतकऱ्यावर चाकूने हल्ला करून जखमी करण्यात आले. आरोपीने पीडिताच्या पाठीवर वार केला, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ व दमदाटी केली आणि शर्टच्या खिशातून ४२०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
फिर्यादी समाधान दादाराव मोरे (वय ३५, शेती, रा. तावडी, ता. बार्शी) सध्या सुवीधा हॉस्पिटल, बार्शी येथे उपचार घेत आहेत. आरोपी संजय विलास आरगडे (रा. तावडी, ता. बार्शी) याच्याविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेची हकिकत अशी : १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता सुमारास मौजे फपाळवाडी येथील सागर चव्हाण यांच्या किराणा दुकानाजवळ तावडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर फिर्यादी होता. त्यावेळी आरोपीने त्याच्याकडे येऊन म्हटले, “तू माझ्याविरोधात खोट्या केसेस करतोस, तुला लय नाज आला आहे.” त्यानंतर आरोपीने जवळील चाकूने फिर्यादीच्या पाठीवर वार केला. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि दमदाटी केली. शर्टच्या वरील खिशात हात घालून ४२०० रुपये काढून घेतले.
फिर्यादी स्वतः जखमी आहे. वापरलेले हत्यार चाकू. घटनास्थळ पोलीस ठाण्यापासून पूर्वेस सुमारे १० किमी अंतरावर आहे. गुन्ह्याचे कारण खोट्या केसेस करण्याच्या आरोपावरून झालेला वाद.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११९(१), ११५(२), ३५२, ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ/१६४५ खेडकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
पोलीस तपास सुरू आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या