*"तू आम्हाला गांजा का आणून देत नाहीस?"; बार्शीत सफाई कामगारावर चार जणांचा जीवघेणा हल्ला*
*"तू आम्हाला गांजा का आणून देत नाहीस?"; बार्शीत सफाई कामगारावर चार जणांचा जीवघेणा हल्ला*
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २७ ऑगस्ट** : शहरातील बस स्टँडजवळ बुधवार सायंकाळी एका सफाई कामगाराला चार जणांनी मिळून शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संदेश अरुण ननवरे (वय ३५, रा. भीमनगर बार्शी) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, दि. २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७.२० वाजता प्रमोद कांबळे यांच्या पानटपरीजवळ (बस स्टँड बार्शी) आधी झालेल्या किरकोळ वादाबाबत बोलावून आरोपींनी “तू आम्हाला गांजा का आणून देत नाहीस, तुला लय माज आला आहे” असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर रोहन भैरवनाथ सुपेकर, अतिश रमेश चव्हाण, रमजान गनी शेख आणि मोहमद रफिक शेख (सर्व रा. बार्शी) यांनी मिळून लाथाबुक्क्याने मारहाण केली. जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यापैकी एकाने हातातील स्टीलचे गोल कडे काढून फिर्यादीच्या डोक्यात मारले. त्यामुळे तो जखमी झाला.
पोलीस ठाण्यापासून पूर्वेस सुमारे १०० मीटर अंतरावर ही घटना घडली. गुन्ह्यात वापरलेले हत्यार हातातील गोल स्टीलचे कडे असल्याचे नोंदवले आहे.
बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५३९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या