*बार्शी तालुक्यात समाजकारणाच्या वादातून युवकावर जीवघेणा हल्ला; तलवार, लोखंडी पाईप व रॉडने मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल!*
*बार्शी तालुक्यात समाजकारणाच्या वादातून युवकावर जीवघेणा हल्ला; तलवार, लोखंडी पाईप व रॉडने मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल!*
*KDM_NEWS_प्रतिनिधी बार्शी, २४ ऑगस्ट २०२६ : बार्शी तालुक्यातील फपाळवाडी येथे १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास समाजकारणाच्या कारणावरून एका युवकावर तलवार, लोखंडी पाईप आणि रॉडने हल्ला करण्यात आला. फिर्यादी संजय विलास आरगडे (वय ३१, रियल इस्टेट व्यवसाय, रा. तावडी ता. बार्शी) यांना डोक्यात, हातांवर, नडग्यांवर आणि पाठीवर जखमा झाल्या असून ते सध्या बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पीटलच्या न्युरो स्टेप डाउन युनिटमध्ये उपचार घेत आहेत.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. २७०/२०२६ अंतर्गत बीएनएस कलम १०९, ११८ (२), ११८ (१), १२६ (२), ३५१ (२), ३५२ आणि ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी म्हणून १) समाधान दादाराव मोरे (रा. तावडी), २) लक्ष्मण यादव (रा. जामगाव पा) आणि ३) महादेव झोडगे (रा. आरणगाव) यांची नोंद झाली आहे.
हकिकतीनुसार, फिर्यादी मोटारसायकलवरून घरातून बार्शीकडे जात असताना मौजे फपाळवाडी येथील दत्ता दळवी यांच्या घरासमोरील रस्त्यावर आरोपींनी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार आडवी लावून त्यांना अडवले. “तू गावच्या समाजकारणात खूप पुढे जातोस, तुला माज आला आहे” असे म्हणत समाधान मोरे यांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवारीने फिर्यादीच्या डोक्यात, हातावर आणि नडगीवर वार केले. लक्ष्मण यादव यांनी लोखंडी पाईपने डोक्यात, कानावर, उजव्या हाताच्या दंडावर, कमरेवर, मानेवर व नडगीवर मारहाण केली आणि “तुझा पाय तोडतो” अशी धमकी दिली. महादेव झोडगे यांनी लोखंडी रॉडने तळव्यावर, हातावर, मनगटावर, पाठीत आणि डाव्या पायाच्या नडगीवर वार केले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या