​बार्शी तालुक्यातील चारे गावात पुन्हा वाघाचा वावर; हल्ल्यात म्हैस जागीच ठार

बार्शी तालुक्यातील चारे गावात पुन्हा वाघाचा वावर; हल्ल्यात म्हैस जागीच ठार 

बार्शी, सोलापूर : बार्शी तालुक्यातील चारे गाव परिसरात पुन्हा वाघाचा वावर आढळल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. वाघाने मेजर पापा यांच्या म्हशीवर हल्ला करून तिला जागीच ठार केल्याची माहिती समोर आली आहे.

गावकऱ्यांनी सोशल मीडियावर वाघ दिसल्याचे फोटो-व्हिडिओ प्रसारित केले. यापूर्वीही चारे परिसरात वाघ दिसल्याच्या घटना घडल्या होत्या. आता पुन्हा हल्ला झाल्याने शेतकरी आणि नागरिक भीतीत आहेत.

येडशी, रामलिंग परिसर तसेच बार्शी तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहावे. शेतात एकट्याने जाऊ नये, रात्री घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. लहान मुले व जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. वाघ दिसल्यास पाठलाग करू नये किंवा गर्दी करून जवळ जाऊ नये. अफवा न पसरवता वन विभाग व पोलिसांना तातडीने माहिती द्यावी.

ग्रामस्थांनी संबंधित यंत्रणांकडे तातडीने पाहणी करून वाघाच्या हालचालींची खात्री करण्याची आणि सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. चारेसह येडशी, रामलिंग व तालुक्यातील नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**