**BREAKING: बार्शी-ताडसौदणे रोडवर पोलिसांची धाड; गांजा विकणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या!**
**BREAKING: बार्शी-ताडसौदणे रोडवर पोलिसांची धाड; गांजा विकणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या!**
KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १९ ऑगस्ट : बार्शी शहर पोलीस ठाण्याने अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण २९८.९२ ग्रॅम गांजा व विक्रीतून मिळालेली रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी अमली पदार्थ आणि मनोविकारी पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क), २०(ब)(ii)(अ), २९ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा क्रमांक ६२४/२०२६ अंतर्गत फिर्याद अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, सोलापूर ग्रामीण येथील सपोफौं विश्वजीत भाऊसाहेब हंचे (वय ५२) यांनी दाखल केली. आरोपींची नावे पांडूरंग नामदेव गोडेराव (वय ४९) व नागेश सदाशिव विभुते (वय ४०) असून दोघेही पंकज नगर, बार्शी ता. बार्शी येथे राहणारे आहेत.
१८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७.३२ वाजता बार्शी ते ताडसौदणे रोडवरील श्री. गोपाळ हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत आरोपींना विक्रीसाठी गांजा बाळगताना पोलिसांनी पकडले. घटनास्थळ बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत उत्तरेस सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे. गुन्हा १९ ऑगस्ट रोजी पहाटे १.३४ वाजता दाखल झाला.
पांडूरंग गोडेराव यांच्याकडून पांढऱ्या रंगाच्या पिशवीत १०९.३१ ग्रॅम गांजा (किंमत सुमारे ५,४६५.५० रुपये) व ५७० रुपये रोख रक्कम जप्त झाली. नागेश विभुते यांच्याकडून लाल पट्टी असलेल्या पांढऱ्या पिशवीतून १८९.६१ ग्रॅम गांजा (किंमत सुमारे ९,४८०.५० रुपये) व ३४० रुपये रोख रक्कम सापडली. एकूण मुद्देमाल १५,८६० रुपये किमतीचा आहे. गांजा हिरवट-काळपट रंगाचा, पाने व बिया असलेला आणि उग्र वासाचा होता.
आरोपींनी चौकशीत सांगितले की, हा गांजा अदिनाथ गायकवाड व त्याचा मुलगा सोनू गायकवाड (दोघे रा. बार्शी) यांनी आणून दिला होता. याबाबत पुढील चौकशी सुरू आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या