**गॅस कनेक्शनसाठी उपोषण; तहसीलच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे**
**गॅस कनेक्शनसाठी उपोषण; तहसीलच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे**
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : गौडगांव येथील सौ. आशा उमराज सुतार यांनी नवीन गॅस कनेक्शन मिळण्यासाठी बार्शी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण केले. गॅस कनेक्शन नसतानाही त्यांच्या बँक खात्यात गॅस सबसिडी जमा होत असल्याने नवीन कनेक्शन मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे तात्काळ कनेक्शन देण्याची मागणी करत त्यांनी आंदोलन छेडले.
तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने संबंधित गॅस एजन्सीला आशा उमराज सुतार यांना तात्काळ नवीन कनेक्शन देण्याच्या सूचना दिल्या. याबाबतचे लेखी पत्र तहसील कार्यालयाकडून दिले गेले.
लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आशा उमराज सुतार यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी पुरवठा अधिकारी आठवले, सामाजिक कार्यकर्ते राहुल भड, अशोक माळी, पांडुरंग घोलप, सतीश बुरगुटे आदी उपस्थित होते.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या