**सोलापूर सैनिकी मुलींच्या वसतिगृहात स्वयंपाकी पदासाठी भरती; २४ ऑगस्टला मुलाखती**
**सोलापूर सैनिकी मुलींच्या वसतिगृहात स्वयंपाकी पदासाठी भरती; २४ ऑगस्टला मुलाखती**
KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, दि. १९ (जिमाका) – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलींचे वसतिगृह, सोलापूर येथे अशासकीय स्वयंपाकीचे एक पद भरावयाचे आहे. या पदासाठी दरमहा १४ हजार १०६ रुपये मानधन देण्यात येणार आहे.
स्वयंपाकी पदासाठी माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना प्राधान्य देण्यात येणार आहे. स्वयंपाकी म्हणून कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य राहील. माजी सैनिक किंवा माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांच्यापैकी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी जीवनातील पात्र उमेदवारांचाही विचार करण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पात्र माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या विधवा पत्नींनी सैनिक सेवेची कागदपत्रे तसेच इतर शैक्षणिक कागदपत्रे दि. २४ ऑगस्ट २०२६ पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे जमा करावीत. पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात येणार आहेत.
उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहताना सर्व मूळ कागदपत्रे तसेच वैद्यकीय तपासणी अहवाल सोबत आणावा. सोलापूर जिल्ह्यातील पात्र व इच्छुक माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या विधवा पत्नींनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या