**मोहोळ : कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या पिकअपसह तिघे ताब्यात; तीन गाई व एक वासरू जप्त**

**मोहोळ : कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या पिकअपसह तिघे ताब्यात; तीन गाई व एक वासरू जप्त** 

KDM NEWS प्रतिनिधी मोहोळ, १६ ऑगस्ट २०२६ : पुणे-सोलापूर रस्त्यावर मोहोळ सीमा परिसरात कत्तलीसाठी जनावरे नेत असल्याच्या संशयावरून मोहोळ पोलिसांनी महिंद्रा बोलेरो पिकअपसह तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पिकअपमध्ये तीन मोठ्या देशी गाई आणि एक पाच दिवसांचे वासरू चारा-पाण्याची सोय न करता दाटीवाटीने भरलेले आढळले.

गोरक्षा सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे येथील सेवक आकाश निवृत्ती धर्मे (२९, रा. फुरसुंगी, पांडव दंड लेन क्र. १, पुणे) यांनी रविवारी सकाळी सुमारे ११.३० वाजता खाजगी कामासाठी पुणेहून सोलापूरकडे येत असताना ही घटना नजरेस आली. त्यांनी पिकअप (क्रमांक केए ३२ डी १८७२) थांबवून तपासणी केली असता चालकाने फक्त दोन जनावरांचे खरेदी पावत्या दाखवल्या. इतर जनावरांची वैद्यकीय तपासणीही झालेली नव्हती. यामुळे जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची खात्री झाल्यानंतर धर्मे यांनी तिघांना पिकअपसह मोहोळ पोलीस ठाण्यास आणले.

आरोपींची नावे : लक्ष्मण पिरप्पा होसमनी (२९, रा. सुदर्शन अपार्टमेंट, सर्वे क्र. १४/१अ/१३/१३१४, वारजे जकात नाका, पुणे), संगाण्णा मारुती कंबर आणि विरेष सिद्राम कंबर (दोघे रा. खजूरी, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक).

जप्त जनावरे : तांबड्या रंगाची सुमारे पाच वर्षे वयाची गाय (किंमत सुमारे २६ हजार रुपये), काळसर रंगाची सुमारे चार वर्षे वयाची गाय (२४ हजार), काळसर रंगाची सुमारे तीन वर्षे वयाची गाय (२० हजार) आणि पाच दिवसांचे काळसर वासरू (५ हजार). पिकअपची किंमत सुमारे ३.२५ लाख रुपये. एकूण मुद्देमाल सुमारे चार लाख रुपये.

मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०७७४/२०२६ नोंदवण्यात आला आहे. प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ५अ, ५ब, ६ व ९ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जनावरे व वाहन जप्त करून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**