*बार्शीत पोलिसांची मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; तीन जण ताब्यात, रोख रक्कम व साहित्य जप्त*

*बार्शीत पोलिसांची मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; तीन जण ताब्यात, रोख रक्कम व साहित्य जप्त* 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, ३१ ऑगस्ट : बार्शी शहर पोलीस ठाण्याने सोमवारी पेट्रोलिंगदरम्यान माहिती मिळताच कल्याण मटका जुगार खेळणाऱ्या तीन जणांना वेगवेगळ्या ठिकाणी पकडले. रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले. महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२(अ) अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.

सपोनि झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ/१ सचिन अशोक नितनात, पोहेकॉ साठे आणि म कोतवाल यांच्या पथकाकडे बातमी मिळाली की सोलापूर रोडवरील ८ नंबर शाळेसमोर बंद टपरीजवळ एक इसम ये-जा करणाऱ्या लोकांकडून अंक आकड्यांवर पैज लावून मटका खेळवत आहे. पंचासह घटनास्थळी गेल्यावर दुपारी १.१५ वाजता संजय दत्तु भालशंकर (२९, बगले बरड, सोलापूर रोड, बार्शी) याला कागदावर आकडे मोडताना पकडले. त्याच्याकडून २५० रुपये रोख, पांढरा कागद (आकडेमोड) आणि निळ्या शाईचा बॉलपेन जप्त करण्यात आले.

दुसऱ्या घटनेत पोकॉ/१८६० अजिज मनसुब शेख यांच्या पथकाकडे बस स्टँड परिसरातील माहिती मिळाली. दुपारी १२.२५ वाजता संदेश राजे मिल्क दुकानासमोर रविंद्र तानाजी दराडे (खुरपे बोळ, बार्शी) याला पकडले. त्याच्याकडूनही २५० रुपये, आकडेमोडीचा कागद आणि पेन जप्त झाले.

त्याच परिसरात दुपारी १२.१० वाजता भारतीय जनऔषधी केंद्र मेडिकलसमोर लतिफ चाँद शेख (५५, आशा टॉकीजजवळ, बार्शी) याला पकडण्यात आले. त्याच्याकडून २०० रुपये रोख, कागद आणि पेन जप्त झाले.

तिन्ही प्रकरणांत जुगार साहित्य आणि रोख रक्कम पंचाच्या उपस्थितीत जप्त करून लेबल लावण्यात आले. आरोपींनी स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी ये-जा करणाऱ्या लोकांकडून पैज लावून कल्याण मटका खेळत असल्याचे आढळले. पुढील तपास सुरू आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**