**बार्शी: १७ वर्षीय विद्यार्थिनीचा छळ करणाऱ्या तरुणावर BNS आणि POCSO कायद्यानुसार कारवाई**

**बार्शी: १७ वर्षीय विद्यार्थिनीचा छळ करणाऱ्या तरुणावर BNS आणि POCSO कायद्यानुसार कारवाई** 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १७ ऑगस्ट २०२६ : बार्शी शहरातील शिवाजी महाविद्यालयाजवळ १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ११ वी सायन्सच्या १७ वर्षीय विद्यार्थिनीला दोन अनोळखी तरुणांनी स्कुटीवरून पाठीमागून येऊन छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादीनुसार, मुलगी आयडेंटिटी साईज फोटो आणण्यासाठी मैत्रिणीसोबत जात असताना पाठीमागून स्कुटीवरून दोन तरुण आले. गाडी चालवणार्‍याने तिला “तू चालत का जात आहेस, माझ्यासोबत स्कुटीवर चल, मी तुला सोडतो” असे सांगितले. उत्तर न दिल्याने ते पुन्हा जवळ आले व “हातातील अंगठी घे, आणखी काय हवे ते देतो, पण सोबत चल” असे म्हणत वारंवार त्रास दिला. नंतर रिक्षा स्टॉपजवळ पुन्हा येऊन मुलीला घाणेरड्या शिव्या देत लज्जास्पद वर्तन केले आणि गाडीवरून निघून गेले.

वडिलांनी नर्सिंग कॉलेजच्या सीसीटीव्ही फुटेज पाहून घटना निश्चित केली. नंतर तपासात आरोपी शेखर पोपट वाघमारे (रा. सिद्धार्थनगर, बार्शी, सध्या पुणे) असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७५, ७८, ७९ तसेच POCSO कायद्याच्या कलम १२ अंतर्गत FIR क्रमांक ०६२१/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

पोलीस तपास सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**