*सोलापूर जिल्ह्यात ७ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन; जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आयोजन*
*सोलापूर जिल्ह्यात ७ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन; जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आयोजन*
KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, दि. १ (जिमाका) : जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी ऐकून त्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे करण्यात आले आहे. ही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमात मागील सहा महिन्यांतील लोकशाही दिनाच्या निवेदनांवर झालेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात येईल. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत प्राप्त अर्ज तसेच ‘आपले सरकार’ पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा आढावा घेऊन संबंधित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या