*बार्शी : सिझेरियन दरम्यान निष्काळजीपणाचा आरोप; डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल*

*बार्शी : सिझेरियन दरम्यान निष्काळजीपणाचा आरोप; डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल* 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी *शहर पोलीस ठाणे येथे वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणी डॉ. रविकिरण भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी उमेश हरीभाऊ महानवर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ जानेवारी २०२४ रोजी रात्री त्यांची पत्नी सोनम  (वय ३१) दुसऱ्या प्रसूतीसाठी डॉ. रविकिरण भोसले यांच्या भोसले हॉस्पिटल, परांडा रोड, बार्शी येथे दाखल झाली होती. रिपीट सिझेरियनसाठी आवश्यक कायदेशीर पात्रता नसतानाही डॉक्टराने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगितले. रात्री सुमारे १०.३० वाजता सिझेरियन केल्याच्या वेळी निष्काळजीपणा झाल्याने सोनमची तब्येत बिघडली. त्यानंतर आधार हॉस्पिटल, सोलापूर येथे उपचारादरम्यान ७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १.१० वाजता तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणात बार्शी शहर पोलीस ठाणे येथे अकस्मात मयत नोंद (क्र. ०५/२०२४) होती. नातेवाईकांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप केल्याने कागदपत्रे वैद्यकीय अधिक्षक, सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर यांच्याकडे पाठवण्यात आली होती. अभिप्राय उशिरा मिळाल्याने १ सप्टेंबर २०२६ रोजी भादवी कलम ३०४, वैद्यकीय व्यावसायिक कायदा कलम ३३ व महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम १९६५ चे कलम २२ अंतर्गत गुन्हा क्र. ६५६/२०२६ नोंदवण्यात आला.
पुढील तपास सुरू आहे...

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**