*बार्शी तालुक्यात थरार! खांडवी शिवारात बंदुकीच्या धाकाने ३.९० लाखांची लुटमार, पती गंभीर जखमी*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, ५ सप्टेंबर २०२६: बार्शी तालुक्यातील खांडवी गावच्या शिवारात रात्री रस्त्यावर चार अज्ञात व्यक्तींनी बंदुकीच्या धाकानं चोरी केली. यात फिर्यादीचे पती गंभीर जखमी झाले असून सोन्याचे दागिने लुटले गेले आहेत. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मंदा रामकिसन लोंढे (वय ३३, रा. माळहिवरा, ता. जि. हिंगोली) यांनी दिलेल्या जबाबानुसार, दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे २.२० वाजता मौजे खांडवी ता. बार्शी गावच्या शिवारात गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली होती. त्यावेळी चार अज्ञात इसमांनी पाठीमागून येऊन तिचे पती रामकिसन वसंतराव लोंढे यांच्या डोक्याला बंदुक लावून धाक दाखवला, शिवीगाळ केली आणि मंदा यांच्या गालात हाताने मारहाण केली. त्यानंतर रामकिसन यांच्या उजव्या हातावर व पोटात बंदुकीतून गोळी मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच गळ्यातील चेन जबरदस्तीने काढून घेऊन अज्ञात व्यक्ती पळून गेले.
या चोरीत एकूण ३ लाख ९० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट झाली. यात गळ्यातील दीड तोळा वजनाचे मिनी गंठण (किंमत १ लाख २० हजार रुपये), कानातील ३ ग्रॅम वजनाचे टॉप्स (३० हजार रुपये) आणि गळ्यातील तीन तोळा वजनाची चेन (२ लाख ४० हजार रुपये) यांचा समावेश आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), ३(५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ३, ७, २५, २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चार अज्ञात व्यक्ती आहेत. हत्यार म्हणून बंदुक वापरण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या