*बार्शी : दरोड्याची पूर्वतयारी करत असताना पाच जण ताब्यात; प्राणघातक हत्यारे व दोन दुचाकी जप्त*
*बार्शी : दरोड्याची पूर्वतयारी करत असताना पाच जण ताब्यात; प्राणघातक हत्यारे व दोन दुचाकी जप्त*
KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, ८ सप्टेंबर : बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत असलेल्या पाच जणांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून प्राणघातक हत्यारे, मिरची पावडर आणि दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई मौजे कोरफळे येथील कोरफळे-यमाई रोडलगत सोमनाथ शेरखाने यांच्या शेताजवळ रात्री १२.२० वाजण्याच्या सुमारास झाली. बार्शी तालुका पोलीस ठाण्यापासून १५ किमी अंतरावर असलेल्या कोरफळे या गावी आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेले आरोपी पुढीलप्रमाणे :
पप्पू शहाजी शिंदे (३९), आकाश बाशा भोसले (३०), बापू शहाजी शिंदे (६०), मनोज बापू शिंदे (१९) – सर्व रा. लाडोळे, ता. बार्शी आणि ईनामदार श्रीमंत भोसले (३५) रा. तांबेवाडी, ता. बार्शी.
पोलिसांनी आरोपींकडून एक ३२ इंच लांबीची लोखंडी कुऱ्हाड, ६० सेमी लांबीचा कोयता, ४२ सेमी लांबीची कटावणी, पाच पाकिटे मिरची पावडर, एक स्कूटर ड्रायव्हर तसेच होन्डा शाईन (एमएच १३ ईटी ६२८३) आणि हिरो एचएफ डिलक्स (एमएच १३ डीबी ६०१५) या दोन मोटारसायकल जप्त केल्या. एकूण मुद्देमालाची अंदाजे किंमत १ लाख ४० हजार ५० रुपये आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४) सह शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ अन्वये बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पोलीस ना. प्रदीप रामेश्वर जगताप यांनी दाखल केलेली फिर्याद नोंदवण्यात आली. तपास सहा. पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्याकडे सोपवण्यात आला असून अहवाल मा. कोर्ट, बार्शी येथे पाठवण्यात येणार आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी दरोडा टाकण्याच्या हेतूने शस्त्रे व मिरची पावडर घेऊन फिरत होते.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या