*मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने चॅरिटेबल ट्रस्ट शाळांसाठी आरटीईची नवी डिजिटल यंत्रणा*

*मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने चॅरिटेबल ट्रस्ट शाळांसाठी आरटीईची नवी डिजिटल यंत्रणा* 

*KDM NEWS प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालविल्या जाणाऱ्या शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्याची (आरटीई) अंमलबजावणी अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नियमित होण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येणार आहे. रुग्णालयांसाठी असलेल्या यंत्रणेच्या धर्तीवर आता शाळांसाठीही आधुनिक डिजिटल प्रणाली लागू करण्यात येईल.

राज्यात मोठ्या प्रमाणावर शाळा सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चालविल्या जातात. आरटीई कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील मुलांना २५ टक्के जागांवर प्रवेश देणे अनिवार्य आहे. मात्र, प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक सुविधा आणि निधी वापराबाबत वारंवार तक्रारी समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर सर्व पात्र विद्यार्थ्यांना कायद्याचा प्रत्यक्ष लाभ मिळावा आणि शिक्षणाचा दर्जा कायम राहावा, यासाठी ही यंत्रणा अस्तित्वात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या डिजिटल यंत्रणेद्वारे शाळांमधील प्रवेश प्रक्रिया, उपलब्ध सोयी-सुविधा आणि आरटीई अंतर्गत मिळणाऱ्या निधीचा वापर यावर थेट प्रशासकीय लक्ष राहील. नियमित आढावा घेणे शक्य होणार असून गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. मुख्यमंत्र्यांच्या या प्रयत्नांमुळे हजारो शाळांमध्ये पारदर्शकता वाढेल आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क अधिक सहज मिळेल.

#आरटीईप्रवेश #DigitalSystem #RightToEducation #MahaGovt

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**