*सातारा हिल मॅरेथॉनमध्ये बार्शीच्या धावपटूंची बाजी; २१ किमीचे आव्हानात्मक अंतर यशस्वी पूर्ण!*

*बार्शीच्या धावपटूंचा सातारा हिल मॅरेथॉनमध्ये डंका; ३७ शिलेदारांचा गौरव!*

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. १४ सप्टेंबर : सातारा हिल मॅरेथॉन २०२६ मध्ये २१ कि.मी.चे आव्हानात्मक अंतर यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या बार्शी रनर्सच्या धावपटूंचा सत्कार बार्शी रनर्स आणि बार्शी सायकलिंग क्लबच्या वतीने शिवशक्ती मैदान येथे आयोजित करण्यात आला.

विविध वयोगटातील ३७ धावपटूंनी ही स्पर्धा पूर्ण केली. त्यापैकी युवराज करळे यांनी अवघ्या १ तास ५८ मिनिटांत अंतर पार करत सर्वाधिक वेगवान कामगिरी नोंदवली. त्यानंतर निलेश खालदकर (२:०४), अमोल ताकभाते (२:०७), अमृत खेडकर (२:१३) आणि डॉ. विजय पवार (२:१४) यांचा क्रमांक लागला. इतर सहभागी धावपटूंनीही २:१५ ते ३:४० या कालावधीत यशस्वीरीत्या शर्यत पूर्ण केली.

याच प्रसंगी सायकलिस्ट निलेश सरवदे यांचा १००० कि.मी. बीआरएम अवघ्या ७३ तासांत पूर्ण केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. युवराज करळे यांचाही दोन तासांच्या आत कामगिरी केल्याबद्दल गौरव करण्यात आला.

सत्कार समारंभाला नागपूरचे उपजिल्हाधिकारी उमेश चव्हाण, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जयकुमार उर्फ बापू शितोळे, बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पीएसआय आबासाहेब शिरगिरे, कुलदीप सोनटक्के, सेकंडरी स्कूल एम्प्लॉयी सोसायटीचे संचालक प्रमोद देशमुख तसेच बार्शी सायकलिंग क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बप्पा बारबोले उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सर्व धावपटूंचा सत्कार करण्यात आला.

बार्शी रनर्स आणि बार्शी सायकलिंग क्लबच्या माध्यमातून शहर व परिसरात धावणे, सायकलिंग आणि फिटनेसची चळवळ सातत्याने राबवली जात आहे. यामुळे अनेक नागरिक नियमित व्यायामाकडे वळत आहेत.

“खेळाडू कधीच थांबत नाही!”

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**