*बाणेगाव येथे ई-पिक पाहणीची निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून प्रत्यक्ष तपासणी*
*बाणेगाव येथे ई-पिक पाहणीची निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून प्रत्यक्ष तपासणी*
*KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, १ सप्टेंबर २०२६ – मौजे बाणेगाव येथे आज निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी ई-पिक पाहणी (DCS) कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांना नोंदणीवेळी येणाऱ्या अडचणी, तांत्रिक समस्या आणि सद्यस्थितीची पडताळणी करून त्यांनी महसूल यंत्रणेला काम अधिक प्रभावी व अचूक करण्याचे निर्देश दिले.
यावेळी ई-पिक पाहणी प्रक्रियेची माहिती घेण्यात आली. शेतकऱ्यांकडून पीक नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी व आवश्यक मार्गदर्शनाबाबत चर्चा झाली. नोंद अचूक व वेळेत होणे महत्त्वाचे असल्याने महसूल यंत्रणेने शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
उपस्थित नायब तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी, पीक पाहणी सहाय्यक, पोलीस पाटील आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्यावर भर दिला गेला. शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले की, पिकांची माहिती अचूक नोंदवावी आणि अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
ई-पिक पाहणीमुळे शेतकऱ्यांच्या पीक क्षेत्राची अचूक माहिती शासकीय अभिलेखात उपलब्ध होते. त्यासाठी शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग आणि महसूल यंत्रणेचे योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे, असे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या