*एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी व मोबाईल चोरीचे चार गुन्हे उघड, ५.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपी अटक*

**एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी व मोबाईल चोरीचे चार गुन्हे उघड, ५.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपी अटक** 

*KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर : शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडी आणि मोबाईल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत ५० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल असा एकूण ५ लाख २६ हजार ६४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत राहत्या घरातून सोन्याचे दागिने चोरी तसेच गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या. याबाबत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(ए) अन्वये चार स्वतंत्र गुन्हे दाखल होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. बिराजदार आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू होता. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या पथकाने गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपास दिशा निश्चित केली.

तपासात दोन संशयित महिलांना अटक करून चौकशी केली. त्यांनी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ५ लाख रुपये किमतीचे ५० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत झाले.

सराईत गुन्हेगार गणेश किसन बोधवाले रा. लोधी सोलापूर याला अटक करून चौकशी केली असता त्याने दोन मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २६ हजार ६४८ रुपये किमतीचे दोन मोबाईल जप्त झाले.

या कारवाईमुळे चार गुन्हे उघडकीस आले असून एकूण ५ लाख २६ हजार ६४८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अरूण देवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. बिराजदार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या पथकाने केली.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**