*बार्शी ख्रिस्ती पहिली मंडळी चर्चच्या निवडणुकीत ‘ख्रिस्ती सेवक’ पॅनलची बिनविरोध निवड!*

*बार्शी ख्रिस्ती पहिली मंडळी: २०२६ च्या निवडणुकीत ‘ख्रिस्ती सेवक’ पॅनलची एकमुखाने बिनविरोध निवड* 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी | बार्शी ख्रिस्ती पहिली मंडळी चर्च (सीएनआय पुणे धर्मप्रांत) येथे २०२६ च्या चर्च निवडणुकीत ‘ख्रिस्ती सेवक’ पॅनलची बिनविरोध निवड झाली. मंडळीच्या सेवेसाठी, आध्यात्मिक वाढीसाठी, एकतेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी व सेवकांनी संकल्प व्यक्त केला.

अध्यक्षपदी प्रीस्ट इन्चार्ज रेव्ह. अभिजीत तुपसुंदरे पाळकसाहेब, उपाध्यक्षपदी मि. शमुवेल अशोक नवगिरे, सेक्रेटरीपदी मि. राकेश प्रेमचंद नवगिरे आणि खजिनदारपदी मि. राजू शशिकांत लोखंडे यांची निवड झाली.

‘ख्रिस्ती सेवक’ पॅनलमध्ये शमुवेल अशोक नवगिरे, आधार सुधाकर दाखले, अविनाश तीमथी चांदणे, राजू शशिकांत लोखंडे, डेव्हिड ताराचंद रणदिवे, रविकांत सूर्यकांत लोखंडे, राकेश प्रेमचंद नवगिरे, प्रशांत प्रमोद चांदणे, सागर वसंत गवळी, रोहित लूथर चांदणे आणि सागर विशाल साने यांचा समावेश आहे.

निवडीनंतर मंडळीच्या सभासदांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सेवकांचे अभिनंदन केले. ही निवड केवळ पदाची जबाबदारी नसून प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा, मंडळीची आध्यात्मिक उन्नती, प्रेम, एकता आणि चर्चच्या विकासासाठी मिळालेली पवित्र जबाबदारी असल्याची भावना व्यक्त झाली. “सेवा हीच आमची ओळख, ख्रिस्त हाच आमचा आधार!” हा संदेश देत सर्वांनी एकजुटीने सेवाभावाने कार्य करण्याचा निर्धार केला.

ही निवड प्रक्रिया प्रीस्ट इन्चार्ज रेव्ह. अभिजीत तुपसुंदरे पाळकसाहेब आणि सह आचार्य रेव्ह. सियोना रणशिंगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यहेज्केल ४४:१४ या बायबल वचनाला केंद्रस्थानी ठेवून नवनिर्वाचित सेवक मंडळीच्या सेवेत कार्यरत राहणार आहेत. सभासदांनी नवनिर्वाचित सेवकांना ज्ञान, नम्रता, प्रेम, एकता आणि सेवाभाव प्रदान व्हावा आणि मंडळीची आध्यात्मिक व सर्वांगीण उन्नती घडावी अशा शुभेच्छा दिल्या.

बिनविरोध निवडीमुळे मंडळीच्या सेवाकार्यात एकता, सहकार्य आणि सामूहिक जबाबदारीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**