*बार्शी विधानसभा मतदारसंघात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी विशेष शिबिरे*
*बार्शी विधानसभा मतदारसंघात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी विशेष शिबिरे*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी*सोलापूर, १८ सप्टेंबर २०२६ भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत २४६ बार्शी विधानसभा मतदारसंघात दावे व हरकती सादर करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ निश्चित करण्यात आला आहे.
या कालावधीत नागरिकांना नवीन मतदार नोंदणी, विद्यमान नोंदीत दुरुस्ती आणि नाव वगळणीसाठी अर्ज सादर करता येणार आहेत.
मुख्य बाबी :
- ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत गैरहजर, स्थलांतरित किंवा इतर कारणांमुळे नाव समाविष्ट न झालेल्या मतदारांना सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणाहून नाव अंतर्भूत करण्याची संधी उपलब्ध आहे.
- ऑक्टोबर २०२४ नंतर मतदार यादी पुनरिक्षण झाले नसल्याने १ ऑक्टोबर २०२४ नंतर १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना नाव नोंदविता आले नव्हते. आता १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या सर्व नवमतदारांना यादीत नाव अंतर्भूत करता येईल.
- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर यांच्या निर्देशानुसार बार्शी मतदारसंघात १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर या चार दिवशी सर्व मतदान केंद्रावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
- या शिबिरांमध्ये महिला आणि दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल.
पात्र नागरिकांनी विशेष शिबिरांमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या