*बार्शी तालुक्यात खळबळ! शेतरस्त्याच्या वादातून महिलांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा*

*बार्शी तालुक्यात खळबळ! शेतरस्त्याच्या वादातून महिलांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा* 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात शुक्रवारी (४ सप्टेंबर) दुपारी शेतरस्त्याच्या वादातून एका महिलेवर कोयत्यांनी घातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून बार्शी तालुका पोलीस ठाण्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी मधुकर बाजीराव गादेकर (वय ६४, रा. शेंद्री, ता. बार्शी) यांच्या म्हणण्यानुसार, घटना उपळाई ठोंगे येथील शेती गट नंबर १११६/२ मध्ये दुपारी साडे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. गोरख बळीराम कोडलिंगे, वैभव गोरख कोडलिंगे, वैष्णव उर्फ बाल्या गोरख कोडलिंगे, शितल गोरख कोडलिंगे (सर्व रा. शेंद्री) आणि भैया वाणी (रा. बार्शी) हे कोयते व काठ्या घेऊन आले. त्यांनी फिर्यादीच्या पत्नी सौ. कालींदा यांना लक्ष्य करून “हिला जिवंत सोडायचे नाही, जिवे ठार मारू” असे म्हणत हल्ला केला.

वैभव, वैष्णव आणि भैया वाणी यांनी कोयत्याने कालींदा यांच्या डोक्यात, दोन्ही हातांच्या दंडांवर, उजव्या हाताच्या खांद्यावर, पोटरीवर आणि डाव्या हाताच्या बोटावर वार केले. महिला जमिनीवर पडल्यानंतरही गोरख कोडलिंगे यांनी “तिला जिवंत सोडू नका, आणखी जिवे ठार मारा” असे आवाहन केल्यावर पुन्हा डोक्यात, कपाळावर आणि चेहऱ्यावर वार करण्यात आले. गोरख आणि शितल यांनी फिर्यादीला धरून हाताने मारहाण केली. जाताना वैभव कोडलिंगे यांनी फिर्यादीला पोलीस तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

कालींदा या गंभीर जखमी अवस्थेत आहेत. बार्शी तालुका पोलीस ठाण्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून बीएनएस कलम १०९(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अंतर्गत गु.र.नं. २९२/२०२६ दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने पोसई/शिरगीरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

पोलीस तपास सुरू आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**