*मानधन व सेवासंरक्षणासाठी ग्रामरोजगार सहाय्यकांचे आमदार राजेंद्र राऊत यांना साकडे; २४ महिन्यांचे थकीत मानधन देण्याची मागणी*
*मानधन व सेवासंरक्षणासाठी ग्रामरोजगार सहाय्यकांचे आमदार राजेंद्र राऊत यांना साकडे; २४ महिन्यांचे थकीत मानधन देण्याची मागणी*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :* ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मानधन व सेवासंबंधी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांना निवेदन सादर केले.
निवेदनात ३ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून २४ महिन्यांचे थकीत मानधन तात्काळ पूर्ण अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर दरमहा १६ हजार रुपये मानधन व २ हजार रुपये प्रवासभत्ता नियमितपणे थेट वैयक्तिक बँक खात्यात जमा करण्याची विनंती केली आहे.
ग्रामरोजगार सहाय्यकांचे काम अर्धवेळ नसून पूर्णवेळ असल्याने त्यांना पूर्णवेळ कर्मचारी म्हणून समाविष्ट करावे, विमा सुरक्षा कवच लागू करावे व कायमस्वरूपी सेवासंरक्षण द्यावे, अशाही मागण्या निवेदनात समाविष्ट आहेत. संघटनेने सांगितले की, ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत या सहाय्यकांची भूमिका महत्त्वाची असून प्रलंबित मागण्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याची विनंती आमदार राऊत यांच्याकडे करण्यात आली.
निवेदन ग्रामरोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष शहाजी घायाळकर, उपाध्यक्ष प्रविण पाडवे व सचिव अमोल ताकमाते यांनी सादर केले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या