*कोरफळे (ता. बार्शी) येथे ३५ वर्षीय गृहिणीचे टोकाचे पाऊल; अज्ञात कारणातून गळफास*

*कोरफळे (ता. बार्शी) येथे ३५ वर्षीय गृहिणीचे टोकाचे पाऊल; अज्ञात कारणातून गळफास* 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. १३ : बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात एका गृहिणीने अज्ञात कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मयत प्रकरण नोंदविण्यात आले आहे.

मयताचे नाव लक्ष्मी विलास सुपेकर (वय ३५, धंदा घरकाम) असून ती कोरफळे, ता. बार्शी, जि. सोलापूर येथे राहत होती. तिच्या पती विलास दत्तात्रय सुपेकर (वय ४२, ) यांनी पोलिसांकडे खबर दिली.

घटनेनुसार, लक्ष्मीने १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यानंतर ते १३ सप्टेंबर पहाटे ४ वाजेपर्यंतच्या कालावधीत घरातील खोलीत लोखंडी पाईपला नायलॉन रस्सीने गळफास घेऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. कारण अज्ञात असल्याचे पोलिसांना कळविण्यात आले आहे.

बार्शी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ अंतर्गत अ.म.नं. ६९/२०२६ नोंदविण्यात आली आहे. असून पुढील तपास सुरू आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**