*बार्शी : खासगी बसमध्ये महिलेचा विनयभंग; आरोपीला पळून जाण्याची संधी दिल्याचा आरोप*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात खासगी प्रवासी बसमध्ये एका महिलेचा विनयभंग झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४ व ७५(१) अंतर्गत प्रथम खबर नोंदणी क्रमांक ३१३/२०२६ दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी ३८ वर्षीय महिला आहे. आरोपी शुभम पॉल (मोबाइल क्रमांक ८४२१२*****). त्याचे पूर्ण नाव व पत्ता अद्याप समजलेले नाही.
घटना २८ सप्टेंबर २०२६ रोजी किल्लारी ते भोसरी (पुणे) जाणाऱ्या अनुष्का ट्रॅव्हल्सच्या बस क्रमांक MH ११ CH ७७५२ मध्ये घडली. २९ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १ वाजता बस खांडवी (तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर) गावाजवळ आली असता फिर्यादीच्या सीटच्या पाठीमागील जागेवर बसलेल्या शुभम पॉलने तिच्या छातीवर दोन्ही हातांनी दाबून विनयभंग केला. फिर्यादीने आरडाओरडा करून कंडक्टर प्रतिक पोटे, ड्रायव्हर लक्ष्मण कांबळे व बस मालक अमोल डोंगरे यांना तातडीने कळवले. मात्र त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात बस नेण्याऐवजी आरोपीला बसमधून पळून जाण्याची संधी दिल्याचा आरोप फिर्यादीने लावला आहे.
प्रकरण भोसरी पोलीस ठाण्याकडून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाले.
आरोपीचा शोध सुरू असून पोलीस तपास सुरू आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या