*कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निवडणूक अधिकाऱ्यांना काटेकोर व पारदर्शक कामकाजाचे निर्देश*
*कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निवडणूक अधिकाऱ्यांना काटेकोर व पारदर्शक कामकाजाचे निर्देश*
**उपस्थित अधिकारी**
उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, सुशांत बनसोडे, सदाशिव पडदुने, सुमित शिंदे, विजया पांगारकर, जयश्री आव्हाड, सचिन इथापे यांच्यासह सर्व तहसीलदार उपस्थित होते.
**जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे मार्गदर्शन**
- ERO व AERO यांनी सोपवलेले काम काटेकोरपणे व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावे.
- कोणत्याही मतदाराला त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी.
- कागदपत्रांची पडताळणी करून कारणे लेखी स्वरूपात नोंदवावीत. मतदारांचे आक्षेप समजून घेऊन नियमानुसार कार्यवाही करावी.
- जिल्ह्यातील नव्याने तयार झालेल्या १७ मतदान केंद्रांशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून काम पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने करावे.
- कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- पहिल्या महिन्यात Unmapped (अद्याप मॅपिंग न झालेले) मतदार व Anomalies (विसंगती) प्रक्रिया पूर्ण करावी.
- दुसऱ्या महिन्यात नमुना अर्ज क्रमांक ६, ७ व ८ संदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी.
- BLO मार्फत आवश्यक कागदपत्रे जमा करून पुढील कार्यवाही करावी.
- कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष व तटस्थपणे काम करावे.
**अंतिम मतदार यादी**
उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुने यांनी सांगितले की, SIR २०२६ अंतर्गत अंतिम मतदार यादीचे प्रकाशन ४ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे. त्यांनी भारतीय संविधानातील अनुच्छेद ३२४ ते ३२९ मधील निवडणूकविषयक तरतुदी, वैधानिक तरतुदी, नमुने, मतदारांचे प्रकार, मतदार यादी व्यवस्थापनाची प्रशासकीय यंत्रणा, नोंदणीसाठी पात्रता-अपात्रता, पुनरीक्षण, भाषा व रचना याबाबत पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
**सुनावणी प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना (प्रांत अधिकारी अकलूज तथा ERO माळशिरस विजया पांगारकर)**
- मतदाराला नाव, पत्ता किंवा तपशीलांमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास आवश्यक पुरावे घ्यावेत. कागदपत्रांची पडताळणी करून मूळ कागदपत्र तपासून छायांकित प्रत कार्यालयीन अभिलेखासाठी जतन करावी.
- महसूल मंडळ कार्यालय किंवा ग्रामपंचायत कार्यालयात सुनावणी घेता येईल.
- प्रत्येक सुनावणीची तारीख, वेळ व ठिकाण पूर्वनियोजित करावे. एका दिवसात जास्तीत जास्त १५० सुनावणी (तीन वेळापत्रकांमध्ये प्रत्येकी ५०) घेता येतील.
- सुनावणीसाठी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून स्वतंत्र टीम तयार करावी. दररोजच्या सुनावणीच्या नोंदी त्याच दिवशी अद्ययावत कराव्यात.
- नोटीस देताना पोहोच घ्यावी व AERO यांनी पडताळणी करावी.
- सुनावणीवेळी मतदाराच्या आई-वडिलांच्या नावासंदर्भातील पुरावे तपासावेत. प्रत्येक कागदपत्राची खातरजमा करून छायांकित प्रत अभिलेखात ठेवावी. मतदाराचा फोटो व नोटीसचा फोटो अपलोड करावा.
- दैनंदिन कामकाजाचा डेटा डाउनलोड करून सुरक्षित जतन करावा. यासाठी स्वतंत्र टीम नियुक्त करावी.
- शाळा सोडल्याचा दाखला हा महत्त्वाचा पुरावा आहे.
- मतदार गैरहजर राहिल्यास दुसरी, त्यानंतर तिसरी सुनावणी घ्यावी. तिसऱ्या सुनावणीनंतरही गैरहजर राहिल्यास निर्णय घेण्याची घाई करू नये.
- संपूर्ण कामकाजाची ऑब्झर्वरमार्फत तपासणी केली जाते. त्यामुळे BLO, ERO व AERO यांनी प्रत्येक टप्प्यावर काळजीपूर्वक काम करावे.
- सुनावणीदरम्यान प्राप्त कागदपत्रांची संख्या व नोंद यांची खातरजमा करावी. रोजनामा फाईल तयार करून प्रत्येक पानाला क्रमांक द्यावा. सर्व बाबींची बारकाईने पडताळणी करून व्यवस्थित अभिलेख व नोंदी ठेवाव्यात.
प्रांत अधिकारी सदाशिव पडदुने व प्रांत अधिकारी विजया पांगारकर यांनी सर्व ERO व AERO यांचे सविस्तर प्रशिक्षण घेतले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या